आठवण... - BuzzingNews 24/7

Breaking

Wednesday, September 23, 2020

आठवण...


लेखिका - खालीदा शेख 

 'मे आय कम ईन मॅम?'
आवाजाच्या दिशेने मी जरा चमकूनच पाहिलं. 20 एक वर्ष असलेली तरुणी उभी मला विचारत होती. 'यस' म्हटल्यावर आत आली. व्हाईट कुरता लखनवी जीन्स परीधान केलेली माझ्या समोर उभी होती. निळसर डोळे पिंगट केसांचा रंग. का कोणास ठाऊक मला ती खूप जवळची असल्या सारखी भासली. मी तिला कम ईन टेक अ सीट म्हटलं. तिने स्वतःची ओळख करुन दिली. मी स्नेहा. स्नेहा सावंत. माझी काल पासून ईथे सी ए म्हणून अपॉइंटमेंट झालीय. तुम्ही लिव्ह वर होता ना मॅम म्हणून मी introduction करुन घेण्यासाठी आलेय. बोलण्यात खूपच गोडवा होता. नजरेसमोरुन चेहेरा हलूच नये असं वाटून गेलं. नंतर तीने स्वतःबद्दल सांगीतलं ते मला चकीत करणारं होतं. ऋषीची ती मुलगी होती. माझ्या बेस्ट फ्रेंडची. वावटळी सारखी समोर उभी होती.
माझं मन अचानक भूतकाळात शिरलं.

ऋषीची आणि माझी एकाच फर्म मध्ये एकाच दिवशी अपॉइंटमेंट झाली होती. मी PA म्हणून आणि तो CA. म्हणून. अशी मी अबोल. कधीतरी लंच ब्रेक असला की कॅंटीनमधे ओझरती भेट व्हायची. Hi Hello पर्यंत बोलणं या पलीकडे संवाद नसायचा. मी तशी सहजासहजी मोकळी न होणारी. त्या दिवशी 12 वाजता मिटिंग होती. Managing Director ने बोलावून घेतलं. चर्चा सुरु असतानाच ऋषीलाही बोलावल्यामुळे तो ही आत आला. आम्ही दोघही प्रथमच इतक्या जवळ एकमेकांच्या बसलो होतो. कुठलंस पर्फ्यूम होत. मन मोहून टाकणारं... त्या दिवशी मी गुलाबी रंगाची साडी नेसले होते. सैलसर वेणी, बकुळीचा गजरा होता. Discuss करताना ऋषीची नजर माझ्या कडे वळली. त्याचे डोळे!!! त्या डोळ्यांची छटा निळसर होती. शांत असलेल्या सागरासारखी. नितळ असलेल्या आस्मानासारखी. मी पटकन कामासंदर्भातील पेपर्स घेऊन बाहेर पडले. आणि ते पेपर्स चाळू लागले. मनातून त्याच्या डोळ्यांची छटा जात नव्हती. इतक्यात Excuse me म्हणून आवाज आला. मी मान वर केली समोर ऋषी उभा होता. तुमचं पेन राहिलं होतं. मी ते घेऊन त्याला थॅंक्स म्हटलं.. Can I sit here for five minutes if you don't mind? मी काही बोलायच्या आतचं स्वारी आसनस्थ झाली. मी त्या perfume मध्ये धुंद होऊन गेले होते.

नकळत मला तो सहवास हवासा वाटला. मनोमनी वाटलं, ' हे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का?'

मॅम काॅफी थंड होतेयं. स्नेहाच्या आवाजाने मी भानावर आले. मी दोघींसाठी कॉफी आर्डर केली होती. कॉफीचा दर्प नाकात शिरला आणि पुन्हा मी आठवणीत धुंद होत गेले. ऋषीला कॉफी खूप आवडायची. त्या दिवशी माझ्या समोर बसल्यानंतर मला वाटलं मिटिंग बद्दल काहीतरी बोलायचं असेल पण तो पर्यंत त्याने टेबलवरील कोरा कागद घेतला. पेनस्टॅंन्ड मधून पेन्सील घेतली आणि लहान मुलांसारखा चेहेरा करत काहीतरी रेखाटायला सुरुवात केली. मी काही बोलू का विचारात असतानाच एकदा त्याने मान वर करून पाहिलं. पुन्हा आपल्या कामात तो व्यस्त झाला. चित्र कोणाच असेल मनात येईपर्यंत त्याने तो पेपर माझ्या समोर ठेवला. माझंच चित्र मस्त काढलं होतं पाच मिनिटात. फक्त कानातील कर्णफुल मोठी होती. गळयाबरोबर माळ होती. त्याखाली see u soon. ऋषी.. मी त्याला थॅंक्स द्यायच्या आत तो ऊठला जाताना क्षणभर थबकला मागे वळून पाहिलं. माझी नी त्याची नजरानजर झाली. मंद हसत तो निघून गेला. मिटिंग झाली. सर्व पेपर्स मी फाईल मध्ये ठेवले. मनात मात्र ऋषीचेच विचार घोळत होते.
दुसर्‍या दिवशी ऑफिससाठी तयारी केली. कालच स्केच आठवलं. मी वार्ड रोब मधून मोठी कर्णफुले काढून घातली अन मोत्याचा सर... चेहर्‍यावर खूप फरक जाणवला. आई मी निघतेय म्हणत दार ओढून घेतलं.
आॅफीसला पोचल्यानंतर केबीन मध्ये निला आली. अन wow. काय मस्त दिसतेस आज. काहीतरी वेगळंच तेज आलयं चेहर्‍यावर. रोजच घाल गं असे कानात... खूप सुंदर दिसतात तुला. चल कॉफी घेऊ या. म्हणून बाहेर घेउन आली. माझी नजर उगाचच ऋषीला शोधत होती. अचानक समोरुन तो येताना दिसला. कालच्या काही पॉईंटस वर बोलायचं आहे म्हणून तो आपल्या केबीनमध्ये शिरला. मी देखील कठपुतली सारखी त्याच्या मागोमाग केबिनमधे शिरले. Have a sit... मी थॅंक्स म्हणायच्या आतच त्याने मला Thank u very much. U r looking gorgeous. कालच्या स्केच सारखं तयार होऊन आल्याबद्दल थॅंक्स.... मला काही बोलूच द्यायच नाही असंच बहुतेक ठरवलेलं असावं स्वारीने. धुंद करणारा परफ्युम..तो आणि मी..

3 comments:

Pages