दिल्ली- चीनने आजवर भारताविरुद्ध अनेक कट रचले आहेत. आता चीनने देशांतर्गत हेरगिरी करण्यास सुरुवात केली आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार चीनी सेना आणि चीनी सरकारशी संबंधित असणाऱ्या 'झेन्हुआ डाटा इंफॉरमेशन टेक्नॉलजी' या कंपनीद्वारे भारतातील 10 हजार प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची डिजिटल माध्यमाद्वारे माहिती चोरल्याची बातमी समोर येत आहे.
चीनकडून सीमेवर तणाव निर्माण करत असतानाच आता चीनने सायबर युद्धाची देखील तयारी दर्शवली आहे. चीनने जवळपास 10 हजार भारतीयांवर नजर ठेवत त्यांची माहिती चोरल्याचे या अहवालातून समोर आले आहे. यामध्ये 5 आजी-माजी पंतप्रधान, राष्ट्रपती, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, सैन्यदल प्रमुख, वैज्ञानिक, पत्रकार, कार्यकर्ता आणि धार्मिक व्यक्तिमत्व यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्कर प्रमुख, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ यांच्यासह गांधी कुटुंब, शिंदे कुटुंब, पवार कुटुंब, बांदल कुटुंब अशा राजकीय कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर पाळत ठेवण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार, ममता बनर्जी, अशोक गेहेलोट, नवीन पटनायक, उद्धव ठाकरे यांच्यासह कैबिनट मंत्री राजनाथ सिंह, रवि शंकर प्रसाद, निर्मला सीतारमण, स्मृति इरानी त्याचप्रमाणे चीफ़ ऑफ़ डिफेंस स्टाफ़ बिपिन रावत, आर्मी, नेवी आणि एयरफोर्स मधील 15 प्रमुख व्यक्तिमत्वांसह मुख्य न्यायाधीश शरद बोबडे, लोकपाल पीसी घोष, 'भारत पे' चे संस्थापक निपुण मेहरा, उद्योगपति रतन टाटा आणि गौतम अडानी या सर्वांचे नाव या यादीमध्ये आहे.
एवढेच न्हवे तर भारतातील 10 हजार लोकांसह ऑस्ट्रेलियाचे 35 हजार लोक आणि जगभरातील 24 लाख अतिमहत्वपूर्ण लोक चीनच्या या डिजिटल हेरगिरीचे शिकार होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येत आहे. चीनच्या या खुरापतींवर आता हे देश काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
Nice
ReplyDeleteVery informative👍🏻
ReplyDelete