"कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीस येण्याची शक्यता"- आरोग्यमंत्री हर्षवर्धन
नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी आता नागरिकांसाठी दिलासदायक बातमी आहे. कोरोना विषाणु विरूद्ध लस पुढील वर्षाच्या सुरूवातीस येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले की, "अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नसली तरी २०२१च्या सुरुवातीच्या काळात ही लस तयार होईल."
दरम्यान डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, "कोविड-१९ची लसीकरण तातडीने अधिकृत होण्याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि जास्त धोका असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना लसीकरण करण्याचा विचार शासन करीत आहे." "एकमत झाल्यावर ही योजना साकारण्यात येईल", असेही ते यावेळी म्हणाले.
'ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना ही लस प्रथम उपलब्ध करुन दिली जाईल' असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. सध्या सुरू असलेल्या लसीची चाचणी आणि देशातील विकासाची माहितीही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. "सुरक्षित आणि प्रभावी लस नैसर्गिक संसर्गापेक्षा वेगवान दराने कोविड-१९ वर प्रतिकारशक्ती स्थापित करण्यास मदत करेल", असेही ते यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment