घरातून प्रत्येक सदस्यांची महिन्याभरात होणार आरोग्य चौकशी - BuzzingNews 24/7

Breaking

Monday, September 14, 2020

घरातून प्रत्येक सदस्यांची महिन्याभरात होणार आरोग्य चौकशी

मुंबई- "राज्यातील प्रत्येक घरांमधील प्रत्येक सदस्याची पुढील महिन्याभरात किमान 2 वेळा शासकीय पातळीवर आरोग्य चौकशी होणार आहे",  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे.
कोव्हिड-१९ चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे, म्हणूनच शासनाने सुरू केलेले 'माझं कुटुंब, माझी जवाबदारी' या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला असता ते म्हणाले, "महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे आणि इतकी जनता असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणे सोपे नाही आणि प्रत्येकाचे घर शोधणे तितकेच कठीण कार्य आहे."

सरपंचापासून ते खासदारांपर्यंत सर्वांनी आपआपल्या वॉर्डची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच आपण हा उपक्रम राबवू शकतो व आपलं काम सुद्धा तितकेच सोपे होईल. पुढील महिन्यात किमान दोन वेळा तरी लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी टिम पाठवावी' असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages