मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी दिली 'ही' नोटिस - BuzzingNews 24/7

Breaking

Tuesday, September 15, 2020

मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी दिली 'ही' नोटिस

पुणे- मराठा आरक्षणाला आता दिवसेंदिवस वेगळेच वळण येत आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाल्याने आंदोलनकर्ते आणि इतर नागरिक सरकारविरुद्ध आक्रमक होत असून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होत आहे. तसेच मराठा आरक्षणाचे पदाधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वेळोवेळी बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये पोलिस प्रशासनाने मराठा आंदोलनकर्त्यांना जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन केले तर करवाईची नोटीस पाठवली आहे. 

मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय आणि संघटनांमधील मराठा समाज पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची जिल्हास्तरावर बैठक पार पडली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना राज्य सरकारने बंदी घातली आहे. पुण्यात कार्यकर्ते एकत्र येऊन १७ सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत होते. यामुळेच मराठा आंदोलनकार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय सूचवत नोटिस पाठवली आहे.'जर जमावबंदीच्या नियमांचे पालन नाही झाले आणि एकाच ठिकाणी 5 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी जमाव केला तर योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल' असे त्या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने राज्यभरात नागरिक आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी यासंदर्भात आंदोलने आणि निदर्शने करण्यात येत आहेत. सध्याचे महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कमी पडले आहे का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. आता मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 

No comments:

Post a Comment

Pages