पाऊस... - BuzzingNews 24/7

Breaking

Wednesday, September 23, 2020

पाऊस...


कवियित्री- खालीदा शेख❤️

तुझ्या माझ्या मनातला
कधी हसवणारा कधी रडवणारा
प्रेमात चिंब भिजविणारा.
आकाशात रंग ऊधळणारा
पाऊस तुझ्या माझ्या मनातला
कधी बालपणात नेणारा
कागदाच्या नावं अलगद
साठलेल्या पाण्यात सोडण्यास मोहविणारा
अलगद गारांचा वर्षाव करणारा
पाउस तुझ्या माझ्या मनातला
गंध मातीचा मनास स्पर्शविणारा
विरहात हीआनंद देणारा
कधी आनंदित करणारा
कधी दुःखाच्या खाईत लोटणारा
पाऊस तुझ्या माझ्या मनातला
रौद्र रूप धारण करून घाबरवणारा
जनजिवन ठप्प करणारा
विनवून देखील न थांबता कोसळणारा
पाऊस पडावा म्हणून नवस करून ही न पडणारा
पाऊस तुझ्या माझ्या मनातला
कधी हसवणारा तर कधी रडवणारा...😢

3 comments:

Pages