मध्यंतरी अॅमेझॉनच्या ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्रात मनसे पक्षाने केली होती. मनसेच्या या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतली आहे.अॅमेझॉन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्या अशी मागणी काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. मनसेची ही मागणी मान्य करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात ग्राहकांना अॅमेझॉन मराठीमधून दिसणार आहे.
अॅमेझॉनचमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासंदर्भात मनसेचे अखिल चित्रे यांनी ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्याकडून ‘अॅमेझॉन अॅपच्या जनसंपर्क विभागाने या संदर्भात प्रतिसाद दिला आहे ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आले असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल असे अखिल चित्रे यांना मिळालेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे की, 'अॅमेझॉनच्या डिजिटल सेवेत (trending app) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ़ बेझोस यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत... राजसाहेब म्हणतात तसं... तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं.' त्यामुळे आता ग्राहकांसाठी अॅमेझॉन अॅप मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे.
No comments:
Post a Comment