कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका - BuzzingNews 24/7

Breaking

Tuesday, September 15, 2020

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

मुंबई:- कांदा निर्यात बंदी म्हणजेच शेतकाऱ्यांच्या तोंडातील घास हिरावुन घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश  तापसे यांनी केली आहे. त्यात मोदी सरकारने निर्यात बंदी लागू केली आहे. अश्यावेळी आम्ही उत्पादीत कांदा विकायचा कुठे आणि साठवयचा कसा? असे दोन प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला विचारले आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज दिसून येत आहेत.

मागिल वर्षी सप्टेंबरमध्ये ( हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूकीच्या आधी) घसरलेली निर्यात बंदी मार्चमध्ये हटवण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी पुन्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप महेश  तपसे यांनी केला आहे.

"शेतकऱ्याने 60 टक्के साठवलेला कांदा हा आधी खराब झालेला आहे आणि भाजपा सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकऱ्याला कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजपा सरकार ही शेतकरी विरोधी आहे",असे महेश तपासे म्हंटले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages