केंद्रीय नितीन गडकरींना कोरोनाचा विळखा - BuzzingNews 24/7

Breaking

Wednesday, September 16, 2020

केंद्रीय नितीन गडकरींना कोरोनाचा विळखा

नवी दिल्ली- देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. मोठमोठ्या सिनेतारकांपासून ते राजकीय नेत्यांना देखील कोरोना विषाणुने विळखा घातला आहे. आता कोरोनाने केंद्रीय मंत्रिमंडळात देखील शिरकाव केला आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सूरु आहे आणि त्यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

स्वतः नितीन गडकरी यांनीच ट्वीट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळींसोबतच सर्वपक्षीय सदस्यांकडून नितीन गडकरींच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. त्याचप्रमाणे आपण स्वस्थ असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं देखील गडकरींनी ट्वीटमध्ये सांगितले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की,‘काल मला जरा अस्वस्थ आणि अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझी तपासणी झाल्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या माझी प्रकृती चांगली असून सगळ्यांच्या प्रार्थना आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे’.

No comments:

Post a Comment

Pages