अहमदाबाद- गुजरात उच्च न्यायालयात सोमवारी चीफ जस्टिस विक्रम नाथ यांच्या कोर्टाच्या कारवाईची यूट्यूब मार्फ़त लाइव्ह सुनावणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला सुनावणी पाहण्याची परवानगी मिळायला हवी असे सांगितले होते, यासाठी उच्च न्यायालयाला याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आज या लाइव्ह सुनावणीमध्ये जनतासुद्धा सहभागी होती आणि या पुढेही जनता गुजरात हायकोर्टाच्या यूट्यूब लाइव्ह सुनावणीत सहभागी होई शकते व सुनावणी ऐकू शकते.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार यामध्ये निरमा यूनिवर्सिटीतील लॉचे विद्यार्थी पृथ्वीराज सिंह जाला यांच्या एका पीएलआयचाही उल्लेख आहे. कोर्टाच्या कारवाईच्या लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी सर्वोच्च कोर्टाने निर्देश जारी करण्याची विनंती केली होती. पृथ्वीराज सिंह जाला यांनी आपल्या या विनंतीच्या आधाराने न्याय आणि ओपन कोर्टाच्या सिद्धांतांचा हवाला दिला होता.
कोरोनाच्या संकटामध्ये सर्वोच्च न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत वर्च्युअल सुनावणी सुरू आहे. या वर्च्युअल सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर वादही सुरू आहे आणि अनेक निर्णयांचीही सुनावणी करण्यात आली आहे. ही वर्च्युअल सुनावणी सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती. त्यामुळे आता कोर्टाची प्रत्येक सुनावणी ही यूट्यूबवर लाइव्ह असणार आहे. त्याचप्रमाणे या लाइव्ह सुनावणी दरम्यान जनतेला यामध्ये सहभाग घेता येणार आहे आणि जनता लाइव्ह सुनावणी ऐकू शकणार आहे.
No comments:
Post a Comment