'पत्रकार हेमंत बिरजे' यांच्यासोबत पत्रकारिता या क्षेत्राबाबत ख़ास संवाद
1) तुम्हाला पत्रकारिता क्षेत्रातच तुमचं career करावं असं का वाटलं?
- पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब मानला जातो. पत्रकारितेमध्ये जे सत्य आहे ते समोर आणण्याची ताकत असते आणि आधीपासूनच नवनवीन गोष्टींवर रिसर्च करणे, नवनवीन विषयांवर लिहिण्याची सवय या सगळ्यांमुळेच मला पत्रकारिता क्षेत्रात career करावं असं वाटलं.
2) या क्षेत्रात तुम्ही किती वर्ष कार्यरत आहात?
- मी या पत्रकारिता क्षेत्रात 16 वर्ष कार्यरत आहे.
3) तुमच्या मते पत्रकारिता या क्षेत्रासाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात?
- पत्रकारिता हा एक challenging जॉब आहे. यामध्ये एकनिष्ठ, सत्यवादी असणे खूप गरजेचे आहे. तुमचे लिखाण, भाषेवर प्रभुत्व आणि सत्य शोधून काढणे, सतत काही न काही लिहिण्याची सवय, कम्युनिकेशन स्किल, नवनवीन गोष्टी समजून शोधून ती घेण्याची आणि त्यावर अभ्यास करून लोकांपर्यंत सत्य आणण्याची ताकत पाहिजे. आणि आताच्या युगात डिजिटल आणि अपडेटेड असणे हे एका पत्रकारासाठी खूप आवश्यक आहे. इंटरनेटवर सतत काही न काही शोधणे, ब्लॉग लिहिणे आणि पत्रकारांमध्ये संयम असणे खूप गरजेचे आहे कारण काही वेळेस एकाच डेस्कवर दिवसभर बसून काम करावे लागते किंवा बाहेर फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करावे लागते. तसेच पत्रकाराला सगळ्याच क्षेत्रातील सगळ्याच गोष्टींमधील ज्ञान असणे आवश्यक आहे.
(health beat related)-
4) हिवाळ्यामध्ये कोरोनाचा धोका जास्त असतो आणि कोरोनाचे प्रमाण जरी आता कमी असले तरी थंडीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे अशी मध्यंतरी चर्चा होती तर या बाबत तुम्ही काय सांगाल?
-हिवाळ्यात फुफ्फुसाच्या निगडित आजार उद्भवण्याची जास्त शक्यता असते कारण हवेमध्ये धुक्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ज्या रुग्णांना फुप्फुसाशी निगडित आजार आहेत त्या रुग्णांना covid १९ चा धोका संभवण्याची शक्यता जास्त असते.
5) डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीपर्यंत कोरोनाचे संकट कमी होईल असे स्वास्थ्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले तर कोरोनाच्या लसीचं वाटप प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कशाप्रकारे नियोजन सूरु आहे?
- सदयस्थितीमध्ये covid १९ चा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारत हा Herd immunity च्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे आणि तज्ञांच्या मतानुसार कोणताही विषाणू अथवा जिवाणू एक peak point पर्यंत वाढतो त्यानंतर त्याची रोग निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते त्यामुळे हळू हळू कोरोनाची रोग निर्माण करण्याची क्षमता कमी होईल.
लस ही अशी गोष्ट आहे की त्यावर खूप जास्त संशोधन गरजेचे असते त्यामुळे ही येणारी लस ही कितपत प्रभावी ठरेल हे सांगणे थोडे कठीणच आहे. जगभरात लस निर्माण करण्याचा प्रयत्न हा युद्धू पातळीवर चालू आहे, खुप लसींचे संशोधन अशा आहेत की त्या ३ टप्प्यात आहेत ही एक आनंदाची बाब आहे. कोरोना लशीने वितरण हे पोलीओ डोस च्या वितरणाप्रमाणे केले जाऊ शकते. प्रत्येक Doctor कडे लस उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे सुरुवातीला ही लस जे रुग्ण आहेत त्यांना आणि जे कोरोनाविरुद्धच्या लढाईत कार्यरत आहेत त्यांना देण्यात येईल आणि नंतर सार्वजनिक पातळीवर या लसीचे वाटप करण्यात येईल. अशा प्रकारची योजना सध्या प्रशासकीय पातळीवर सूरु आहे.
6) अनेक ठिकाणी कोरोना उपचाराच्या नावाखाली काळा बाजार सुरू आहे, नागरिकांची, कोरोना रुग्णांची आर्थिक लूट सूरु आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
- हो काहीजण याचा गैरफायदा घेताना आपण पाहतो, जसे की कोरोना आजार घालवण्यासाठी चुकीची नकली औषधे-इंजेक्शन्स विकणे, immunity वाढवण्यासाठी हानिकारक, नकली औषधे आणि PPE Kit चा जास्त प्रमाणात गैरसाठा केला जात आहे. पण सर्वच जण गैर फायदा घेत आहेत अश्यातली गोष्ट नाही. कोरोनावर मात करण्यासाठी मुबलक प्रमाणात मनुष्याबळ हवे आहे आणि ते उपलब्ध होत नसल्याने अधिक प्रमाणात वेतन देऊन ते उपलब्ध करून देणे ही हॉस्पिटलवर मोठी जबाबदारी आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना PPE kit दिवसातून एकासाठी दोन या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे लागत आहेत.
7) कोरोनाचं सावट पसरल्यानंतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागाकड़े वळू लागले आणि ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढला तर ग्रामीण भागातील लोक कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सजग आहेत का? आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा तिथल्या नागरिकांना किती उपयुक्त आहेत?
-शहरी भागात कोरोना पसरत आहे असे लक्षात येताच शासनाने तातडीने Lock down घोषित केले. पण भारतात मध्यम वर्गीय जनता खुप मोठ्या प्रमाणात राहते आणि त्यामुळे शहारामध्ये बिना काम करता राहणे व तेथील सर्व खर्च पाहणे हे त्या जनतेला शक्य नव्हते म्हणून शहारातील जनतेने गावाकडे धाव घेतली. काही खेडेगावा मध्ये विलगीकरण मोहीम ही पाहिजे तितकी योग्य रितीने राबवली गेली नाही त्या कारणास्तव कोरोना हा खेडेगावामध्ये सुद्धा पसरत गेला. ग्रामीण आरोग्य यंत्रणा ही पुरेशा प्रमाणात विकसित नसल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत गेला व ती पुरेश्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले. मात्र आता ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सजग आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा योग्य उपचार मिळावे आणि तेथील यंत्रणा चांगल्याप्रकारे कार्यरत असावी यासाठी प्रशासकीय विभाग प्रयत्न करत आहेत.
8) WHO ने नेमलेल्या आयोगाने कोरोनाच्या सामूहिक संसर्गाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगवर कशाप्रकारे अभ्यास केला आहे?
- WHO या संस्थेने जगातील प्रख्यात अशा तज्ञांकडून माहिती गोळा करून खुप सारे प्रस्ताव जगासमोर मांडले त्यातील एक म्हणजे social distancing. आणि हा एकमेव उपाय होता की ज्यामुळे कोरोना हा विषाणु पसरण्यापासून रोखला जाऊ शकत होता.तसेच पहिल्या दिवसापासून जगातील शास्त्रज्ञ आणि संशोधक सोशल डिस्टन्सिंगबाबत वेगवेगळे मत मांडत आहेत. आता तर काही तज्ञ सोशल डिस्टन्सिंगसाठी नवनवीन फॉर्मूल्ये देत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार, दोन मीटरचे अंतर हे एक मिटरच्या अंतरापेक्षा दहा पटीने अधिक सुरक्षित आहे.
9) लॉकडाऊनमुळे व्यवसाय, उद्योग- लघुउद्योग गेले; अनेक नागरिक बेरोजगार झाले आणि देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आता देशाला आर्थिक अडचणींमधून सरकार कशाप्रकरे वाचवेल आणि त्यासाठी कशाप्रकारचे नियोजन करण्यात येईल असं तुम्हाला वाटतं?
- लॉकडाऊनमध्ये आर्थिक मंदी जगभरात दिसून आली. काही देशांनी तर कोरोनाला न जुमानत Lockdown रदद करत आर्थिक मंदी सावरण्याचा प्रमत्न देखील केला आणि भारत हा लॉकडाऊन रदद करणारा सर्वात शेवटचा देश आहे. तरीही भारताचा GDP हा इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरला नाही याचे कारण म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण लघुउद्योग-व्यवसाय यांवर मात्र मोठ्या प्रमाणात घाला बसला. आता सरकार या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवू शकते आणि नक्कीच या योजनांमुळे त्या लोकांना फायदा होईल.
10) लॉकडाऊनमुळे होणारे अन्य आजार म्हणजेच डाइबिटीस्, हाइपरटेंशन, डिप्रेशन, हृदयाचे आजार अशा अनेक आजारांनी सध्या माणूस वेढलेला आहे, काहींनी तर कंटाळून डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या देखील केली तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?
- खर तर कोरोना हा डायबिटीस, उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार असणाऱ्या लोकांना जास्त प्रमाणात हानिकारक आहे त्यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली नसली तर त्यांनादेखील या आजाराला सामोरे जावे लागत आहे. कोरोनासाठी वापरले जाणारे औषध हे देखील हदयावर परिणाम करत असल्याने देखील लोकांना हदयविकाराला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे माणसाचे माणसिक खच्चीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे ही लोकांना नैराश्य, चिंता या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे आणि लॉकडाऊनमुळे देखील माणसांना अनेक अडचणी, टेंशन, तणाव आणि डिप्रेशन या सगळ्याचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.
No comments:
Post a Comment